Yashwant Factory : ‘यशवंत’ कारखान्याच्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड! थेऊरला १५ वर्षांनंतर जल्लोषाला उधान…!!
Yashwant Factory उरुळीकांचन : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सुभाष चंद्रकांत जगताप व उपाध्यक्षपदी मोरेश्वर पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याची नुकतीच संचालक मंडळाची निवडणुक पार पडली आहे. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कारखाना कार्यस्थळावर बुधवार (दि.१७) निवडणूक झाली. निवडणुक अधिकारी डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीसाठी अध्यक्षपद व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांचेच उमेदवारी अर्ज आल्याने, पाटील यांनी “यशवंत”च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे. Yashwant Factory
दरम्यान तब्बल १५ वर्षांनंतर झालेल्या बंद यशवंत”च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर आणि हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने २१ पैकी तब्बल १८ जागा जिंकत कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते.
कारखान्यासाठी पोलिस कोठडी ते चेअरमनपद असा प्रवास…
अर्थिक अनियमितता व भागभांडवल अभावी बंद पडलेल्या ‘यशवंत’ कारखान्याचा तत्कालीन संचालक मंडळावर शेतकऱ्यांच्या थकित एफआरपी व उस बिलापोटी संचालक मंडळावर दाखल झालेल्या गुन्ह्यात एकमेव अटक होऊन पोलिस कोठडीची कारवाई सुभाष जगताप यांना भोगावी लागली होती. तत्कालीन संचालक मंडळात फक्त एकाच संचालकाला पोलिसांनी घरात घुसून राजकीय दबाबातील अटक केल्याची चर्चा तालुक्यात होती. या कारवाई नंतर राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र तोच संचालक आता कारखान्याचा अध्यक्ष म्हणून विराजमान होतो असा राजकीय प्रवास सुभाष जगताप यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर चर्चेला आला होता.