Yashwant Factory : ‘यशवंत ‘चे किंगमेकर प्रकाश जगताप! विरोधकांना चारीमुंड्या केले चितपट..!!

जयदिप जाधव
Yashwant Factory उरुळी कांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल १५ वर्षा नंतर झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत उरुळीकांचन गट क्र.१ या उस उत्पादक गटातून आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने कारखान्यावर शेतकरी विकास आघाडीची विजयाची घौडदोड सुरू झाली आहे. पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांच्या गट क्र.६ या वाडेबोल्हाई गटात पॅनेलला जवळपास ५०० मतांचे निर्णायक आघाडी घेतल्याने कारखान्यावर विजयाची घौडदौड सुरू झाली आहे.
अत्यंत प्रतिष्ठेने व आरोप -प्रत्यारोपांनी गाजलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर कोणाची सत्ता स्थापन होणार म्हणून जिल्ह्याचा नजरा या कारखान्याचा निवडणूकीकडे लागल्या होत्या. हवेली तालुक्यातील प्रस्थापितांनी एकत्र येऊन आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या माध्यमातून पॅनेल उभे केल्याने प्रस्थापित नेतेमंडळी विरुद्ध बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय होता.
परंतु मतमोजणीत पहिल्याच गटात पॅनेलला मोठ्या मतांचे मताधिक्य मिळाल्याने निकालावरुन प्रस्थापित नेतेमंडळींना सभासदांनी झिडकारल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे. या सर्व निवडणुकीत प्रक्रीयेत कारखान्याची निवडणूक एकाकीपणे लढणाऱ्या प्रकाश जगताप यांच्या वाडेबोल्हाई गटात त्यांनी पॅनेलला निर्णयाक ५०० मतांचे मताधिक्य दिल्याने कारखान्यावर एकतर्फी विजयाची घोडदौड पॅनेलने सुरू केली आहे.
प्रकाश जगताप यांच्या पॅनेलच्या विजयी घौडदौडीत मुळा मुठा नदी व मुठा नदी पट्यात सभासदांनी पॅनेलला अनुक्रमे गट क्र. ५ व ६ मध्ये भरीव मताधिक्य दिले आहे. तर दुसरीकडे पॅनेलप्रमुख प्रशांत काळभोर व बाळासाहेब चौधरी यांनी दिग्गज नेतेमंडळींचे आव्हान सोलापूर रस्त्यावरील चार गटांत थोपविल्याने पॅनेलला विजयी मताधिक्य मिळाले आहे.
दौंडकरांनी दाखविला स्वाभिमान…
यशवंत कारखान्याच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे गट क्र.५ व ६ मध्ये शेतकरी विकास आघाडीला निर्णयाक आघाडी दिली आहे. मात्र दरवेळी कारखान्याचे संचालक पद हुकत असलेल्या दौंड तालुक्यातील सभासदांनी मात्र तालुक्यातील उमेदवारांच्या पाठिशी उभे राहत आपला स्वाभिमान जपला आहे. त्यामुळे शेतकरी विकास आघाडीचा दौंड तालुक्यात दोन उमेदवार देणे फायद्याचे ठरले आहे.