Yashwant Factory : ‘यशवंत ‘ कारखान्याच्या निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सहकार क्षेत्रातील निवडणूकीचे कामकाज पाहिले होते काय? पराभूत उमेदवाराची सहकार प्राधिकरणाकडे तक्रार ..!!
Yashwant Factory उरुळीकांचन : तब्बल दिड दशकानंतर झालेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीला एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर या निवडणूकीचा पद्माभार सांभाळणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी शितल पाटील यांच्या कामाकाजाची तक्रार राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांच्याकडे एका पराभूत उमेदवाराने केली आहे. निवडणूक प्रक्रिया राबवितानाचा गोंधळ पाहताना या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामाकाज नियमानुसार केले नसल्याचे तक्रारीत मांडून शितल पाटील यांनी सहकारी संस्थेची यापूर्वी निवडणूक प्रक्रिया राबविली काय म्हणून सहकार विभागातून माहिती माहिती अधिकारातून माघविली आहे.
‘यशवंत’ कारखान्याची ९ मार्च रोजी निवडणूक पार पडून १० मार्च रोजी निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडली आहे. त्यानं तर २ मार्चला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी शितल पाटील यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविताना नियमानुसार कामकाज पार पडले नसल्याची तक्रार सहकार प्राधिकरणाकडे झाली आहे.
शितल पाटील यांनी निवडणुकीचे कामकाज पाहताना निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन करणे गरजेचे असताना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे जाणविले आहे. प्रत्यक्ष मतदान करुन घेताना सभासदांना एकाच वेळी दहा मतपत्रिकांचा गठ्ठा कर्मचारी हातात देऊन सभासदांना मतदान करावायास भाग पाडीत होते.
अशावेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नसल्याने अशिक्षित सभासदांना मतदान प्रक्रिया करताना अडचणीत येऊन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव असल्याने ११०० हून अधिक मतदान बाद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी मतदान केंद्र निवडताना उशिर, मतदान केंद्राचे अंतर निवडताना निकष पाळले नसल्याने म्हटले आहे. Yashwant Factory,
उमेदवार व मतदार यांचे मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे गरजेचे असताना, दोन्ही बाजूंना विश्वासात न घेऊन प्रक्रिया पार पडली आहे. मतदान केंद्रावर पासेस नसल्याचा गोंधळ व मतमोजणी दिवशी उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश मिळण्यास झालेली फारकत यांमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत त्यांचा अनुभवाची उणीव दिसली असून सोरतापवाडी गटातून पराभूत उमेदवार मारुती सिताराम चौधरी यांनी राज्य सहकार प्राधिकरणाकडे तक्रार करुन त्यांच्याकडून शितल पाटील यांनी यापूर्वी सहकार क्षेत्रातील निवडणूक कामकाजाची नियुक्ती झाली आहे का ?माहिती अधिकारातून माहिती माघविली आहे. यासंदर्भात शितल पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.