Yashshree Shinde Murder : अटक होताच गुन्ह्याची कबुली, दाऊद शेखने यशश्रीची हत्या का केली? धक्कादायक माहिती आली समोर…


Yashshree Shinde Murder : उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीच्या हत्याकांडाने सगळा देश हादरला. या प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी यशश्री शिंदेच्या हत्येचा घटनाक्रम माध्यमांना सांगितला आहे.

आरोपी याने प्राथमिक तपासात गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली आहे. तसेच, त्याला नवी मुंबईत आणल्यानंतर सखोल चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

२७ तारखेला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होतचा. आज घटनेचा पाचवा दिवस आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी डीसीपी क्राइम आणि डीसीपी झोन २ सीपींच्या मार्गदर्शनाखाली ८-९ पथकं काम करत होते. आम्हाला नातेवाईक, मित्रपरिवार, स्थानिकांच्या चौकशीत आणि तांत्रिक तपासणीतून जे समोर आलं त्यानुसार दोन तीन जणांवर संशय होता. Yashshree Shinde Murder

त्यानुसार पोलिसांचं पथक नवी मुंबई आणि कर्नाटकात पाठवले होते. दोन पथकं कर्नाटकात थांबलेलं होतं. आम्ही त्यांना इथून इनपूट देत होतो. त्याआधारे आज सकाळी दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आले, असे दीपक साकोरे यांनी सांगितले आहे.

घटना घडल्यानंतर त्याचं लोकेशन सापडत नव्हतं, तो कर्नाटकचा आहे इतकीच माहिती आमच्याकडे होती. त्याच्या मित्राने माहिती दिली आणि त्याआधारे कर्नाटकातील शहापुरातील अलधल या गावातून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणात मोहसिनला ताब्यात घेण्यात आलेलं नाही.

तो मृत तरुणीत्या संपर्कात असल्याने संशयाच्या फेऱ्यात होता. पण, मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दाऊदला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही संशयित सध्या नाही, असंही अतिरिक्त पोलिस आय़ुक्तांनी सांगितले आहे.

दरम्यान, ते दोघं एकमेकांना ओळखत होते, त्यांनी भेटायचं ठरवलं होतं. हे अपहरणाचं प्रकरण नाही. ते भेटले, त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली अशी शक्यता आहे. ते गेल्या कताही महिन्यांपासून पुन्हा संपर्कात असल्याची माहिती आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!