Yashshree Shinde Murder : पोलिसांना मिळाला यशश्रीचा मोबाईल, उरण हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर…
Yashshree Shinde Murder : काही दिवसांपूर्वी उरणमध्ये हादरवून सोडणारं हत्याकांडने खळबळ उडाली होती. यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं यशश्रीची हत्या केली. दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
यशश्री शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. रांजनपाडा रेल्वे स्टेशन परिसरात यशश्रीचा मोबाईल पोलिसांना मिळाला. हा मोबाईल पाण्यानं भिजला आहे, त्यामुळे आता पोलीस ठाण्यात येऊन फॉरेन्सिक टीम या मोबाईलची दुरुस्ती करणार आहे.
या मोबाईलमध्ये यशश्री आणि दाऊद यांच्यात झालेल्या संभाषणाचं रेकॉर्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यशश्रीचा मोबाईल पूर्णपणे दुरुस्त झाल्याशिवाय त्यामध्ये काय आहे, हे समोर येऊ शकणार नाहीये. सापडलेल्या मोबाईलच्या मदतीनं आणखी काही खुलासे होऊ शकतात का? याचा तपास देखील पोलिसांकडून सुरू आहे. Yashashree Shinde Murder
दरम्यान, यशश्रीची हत्या ही एकतर्फी प्रेमातून झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे, हत्येनंतर पळून गेलेल्या दाउदला पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे.