World Cup 2023 : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अनोखी घटना, खेळाडू न खेळताच झाला आउट, नेमकं कसं? जाणून घ्या..

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३८ वा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजी करत आहे आणि याच दरम्यान असे काही घडले, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.
वास्तविक, अँजेलो मॅथ्यूजला अशा प्रकारे आऊट करण्यात आले, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच घडले नव्हते. अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्यात आला आणि श्रीलंकेची पाचवी विकेट गेली. World Cup 2023
श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एका वादग्रस्त निर्णयामुळे विकेट गमवावी लागली. टाईम आऊटमुळे मॅथ्यूजला बाहेरचा रस्ता धरावा लागला पण टाईम आऊट म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा नियम काय सांगतो ते आपण इथे जाणून घेऊया.
दरम्यान, फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचावे लागते. मॅथ्यूज मैदानात पोहोचला परंतु निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करू शकला नाही. अशा स्थितीत बांगलादेशच्या कर्णधाराने ‘टाईम आऊट’चा दाखला देत विकेटसाठी अपील केली, ज्यावर पंचांनी बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला. World Cup 2023
पंचांनी बाद घोषित करताच वाद चिघळला अन् मॅथ्यूज आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आउटवर बाद होणारा मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
मॅथ्यूजला बाद घोषित करताच श्रीलंकन फलंदाजाचा पारा चढला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मॅथ्यूजने रागामध्ये हेल्मेट देखील फेकून दिले. मॅथ्यूज या निर्णयावर असहमत होता. त्याला विश्वासही बसत नव्हता.
पंचांनी बाद घोषित केल्यानंतर मॅथ्यूजने बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, नियमानुसार शाकीबने अपील केली अन् पंचांनी बाद घोषित केले.
विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर हर्ट झाल्यानंतर येणार्या फलंदाजाला ३ मिनिटांत खेळपट्टीवर येऊन चेंडू खेळावा लागतो. तसे न झाल्यास विरोधी संघ फलंदाजाच्या विरोधात अपील करू शकतो.
खरं तर मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून फलंदाजीसाठी आला होता. पण चूक लक्षात आल्यानंतर त्याने हेल्मेट बदलले. पण यासाठी वेळ गेला. यादरम्यान बांगलादेशी खेळाडूंनी त्याच्या विकेटसाठी अपील केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापद्धतीने बाद होणारा मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे. सदीरा समरविक्रमा तंबूत परतल्यानंतर मॅथ्यूज फलंदाजीसाठी आला होता.
आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या प्लेइंग कंडिशनच्यानुसार विकेट पडल्यास किंवा फलंदाज रिटायर हर्ट आऊट झाल्यास, पुढील फलंदाजाने २ मिनिटांच्या आत चेंडू खेळण्यासाठी तयार असले पाहिजे. असे न झाल्यास फलंदाजाला टाइम आऊट जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूची वेळ संपली.