World Cup 2023 : पुण्यातील भारत बांगलादेश सामन्यावर शेतकरी खुश अन् गावकरी नाराज, नेमकं काय घडलं?


World Cup 2023 पुणे : आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्ताननंतर आता भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाने सलग चौथा विजय नोंदवला आहे. World Cup 2023

सामन्यात भारताने सात विकेटने विजय मिळवला. पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. विराट कोहली याने शतकी खेळी केल्यामुळे क्रिकेटप्रेमी जाम खुश झाले. World Cup 2023

कोहलीने शानदार फलंदाजी केली. त्याने २६ हजार धावांचा टप्पा या सामन्यात पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा जगातील चौथा फलंदाज विराट कोहली ठरला. विराटच्या खेळीमुळे पुणे गहुंजे स्टेडियमवर चैत्यन्य निर्माण झाले होते. त्यावेळी गहुंजे येथील शेतकरी खुश होते. परंतु ग्रामस्थ नाराज झाले. शेतकरी खुश आणि ग्रामस्थ नाराज होण्याचे कारण वेगळेच आहे.

तसेच यावेळी सामन्यामुळे गावातील शेतकऱ्यांची चांगलीच कमाई झाली. यामुळे शेतकरी खुश झाले. एमसीएने गुरुवारी झालेल्या सामन्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी ४२ एकर जमीन भाडेतत्वावर घेतली होती. शेतकऱ्यांना पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या पाच सामन्यांसाठी चांगला मोबदला एमसीएने दिला आहे.

एक एकर जमीनसाठी एक लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन स्टेडियमजवळ आहे, त्यांना जास्त भाडे दिले जाणार आहे. स्टेडियमपासून लांब असणाऱ्या जमिनीसाठी कमी भाडे असणार आहे.

दरम्यान, गहुंजे येथे झालेल्या सामन्याची तिकीटे गावकऱ्यांना मिळाली नाही. यामुळे गावकरी नाराज झाले आहेत. गावकरी म्हणतात, आमच्या गावात सामना आहे आणि आम्हालाच तिकीट मिळत नाही. तसेच स्टेडियमवर तिकीट काउंटर नाही.

गावकरी या सामन्याचे तिकीट घेण्यासाठी अनेकवेळा स्टेडियमवर जाऊन आले. परंतु त्यांची निराशच झाली. सामन्याच्या एका दिवस आधी अनेक युवक तिकीट घेण्याच्या अपेक्षेने स्टेडियमवर गेले. परंतु त्यांची निराशाच झाली. यामुळे शेतकरी खुश, गावकरी का नाराज झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!