कार्यकर्त्यांची इच्छा दादांनी मुख्यमंत्री व्हावं, पण दादांची इच्छा कारखान्याचे चेअरमन व्हावं, माळेगावमध्ये वातावरण तापले..


बारामती : बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करत कारखान्याचा चेअरमन मीच होणार असल्याचे सांगितले. यामुळे वातावरण तापले आहे. यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.

अजितदादांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हाव पण अजित दादा कारखान्याचे संचालक पदासाठी उभे आहेत अशी टीका विरोधक करत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही मेसेज वायरल होत आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हाव पण अजित पवारांची इच्छा कारखान्याचा चेअरमन व्हावं असे मेसेज फिरत आहेत.

अनेकांनी याबाबत स्टेट्स ठेवले आहेत. या कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत ठाण मांडून आहेत. या निवडणुकीसाठी चार पॅनल उभे असून शरद पवार गटाने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे चंद्रराव तावरे यांनी देखील जोरदार प्रचार सुरू केला आहे.

तसेच शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रचार सभा घेत गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यामुळे कारखान्यावर नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या विरोधक अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

अजित पवारांनी या निवडणुकीसाठी स्वतः शड्डू ठोकलाय. त्यामुळे इथल्या निवडणुकीचा एक वेगळाच रंग पाहायला मिळत आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नीळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बळीराजा सहकार बचाव पॅनल, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती पॅनल आणि अपक्षांचा एक पॅनल असे रिंगणात उतरले आहेत.

अजित दादा कारखान्याचे अध्यक्ष होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित दादांनी थेट स्वतःच्या नावाची घोषणा केली. ‘मी चेअरमन झालो तर योग्य पद्धतीने कामगारांचे प्रश्न मार्गी लावेल’, असं दादा म्हणाले. तर स्वतःच्या नावाची चेअरमन पदासाठी घोषणा करून अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा घालवली, असेही म्हटले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!