घोडगंगा कारखान्यावर शेतकऱ्यांच्या थकीत वसुली नोटीशी नंतर कामगारही आक्रमक, म्हणाले ५० टक्के पगार द्या, अन्यथा….; आमदार अशोक पवारांना दिला इशारा

शिरूर : शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अर्थिक अडचणींमुळे साखर कारखान्यातील कामगारांचे सुमारे दिड वर्षाचे पगार थकले आहेत. त्यामुळे कामगार सुमारे दिड महिने तालुक्यातील विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत.
कारखान्याचे माजी अध्यक्ष, संचालक व आमदार अशोक पवार यांनी कामगारांना कालच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र कामगारांनी ५० टक्के पगार तेंव्हाच आंदोलन माघे घेऊ अशी आक्रमक मागणी केल्याने परिणामी
कामगारांनी आजपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी ने यापूर्वी घोडगंगा कारखान्याला साखर
आयुक्तांनी १५ कोटींची जप्तीची नोटीस बलावली आहे. अशातच २५ कोटी थकीत पगारासाठी कामगार हे गेली दिड महिने आंदोलन करण्यावर ठाम असल्याने अर्थिक अडचणीत आलेल्या या कारखान्याच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.
कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीच्या वेळ आल्याने कामगारांनी थकलेले पगारांतील कमीत कमी ५० टक्के रक्कम द्यावी, अन्यथा वाटेल ती किंमत मोजायला तयार असल्याचा निर्वाणीचा इशाराच कारखाना व्यवस्थापनासह माजी अध्यक्ष आमदार अशोक पवारांना दिला आहे. शिरूरसह हवेली व पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
वर्षभरापासून पगार झाले नसल्याने अडचणीत आलेल्या कामगारांना सोमवारी लोकसहभागातून जमा केलेले अन्नधान्य, किराणा किटचे वाटप करण्यात आले. यासाठी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. अनेक नेते कामगारांना पाठिंबा देत आहेत.
या कार्यक्रमानिमित्त घोडगांगा कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलनाच्या ४५ व्या दिवशी सोमवारी कामगारांसह त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. त्यांचा कुटूंब उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव काळे, तात्यासाहेब शेलार, महादेव मचाले आदींनी कारखाना व्यवस्थापनासह आमदार पवारांवर हल्लाबोल केला. यामुळे पगार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.