महिला दिनाची भेट! 2 कोटी 52 लाख रुपये अखेर लाडक्या बहिणींचा खात्यावर जमा…

मुंबई : राज्यात आज लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून या योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी ५२ लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १५०० रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली. यामुळे महिलांना पैसे आले की नाही हे बघण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी व मार्च असे दोन्ही महिन्याचे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात एकूण किती लाभार्थी पात्र ठरणार, याबाबत उत्सुकता लागून होती. याबाबत पैसे कधी येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्याचवेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे वितरण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार ७ मार्चला दोन कोटी ५२ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत’, असे तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, आपली लाडकी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे, हेच आमचे प्रमुख ध्येय असून त्या दृष्टिकोनातून राज्यातील महिलांसाठी सुरक्षा ॲप सुरू करण्यात येणार आहे,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत अनेक महिला अपात्र झाले असल्याचे देखील सांगितले जात आहे.