दारू पिऊन महिलांचा राडा, पोलिस अधिकाऱ्यांना घेतला चावा ….


 

मुंबई :विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पश्चिम येथील गोकुळ टाऊनशिपमधील एका बारमध्ये तीन महिलांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून चावा घेतल्याचा आरोप आहे. या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमधील एका रेस्टॉरंट बारमध्ये तीन महिला दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वंजारी, इतर पोलीस अधिकारी आणि हवालदार घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्या महिलांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले. एवढेच नाही तर एका महिलेने पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश हिसकावून त्याला ओढले

 

या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!