महिलांना दिलासा ! आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, आदेश जारी…!

मुंबई : एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय आजपासून लागू होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती. यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आता एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे.
याबाबत कधी निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या आदेशाचा जीआर निघाला असून आज एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. दरम्यान, आता एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या आधारे सवलत देण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे.
जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. यामुळे याचा प्रवाशांना मोठा फायदा होतो. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते.