महिला स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी गेली, गॅस सिलेंडरचा स्फोट; चार ठार

उत्तर प्रदेश : महिला स्वयंपाकघरात सकाळी चहा करण्यासाठी गेली असता त्यावेळी अचानक गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे एक महिला आणि तिच्या तीन मुलांचा, आणि एका ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात डुमरी गावातुन समोर आली आहे.
आरती (४०), कुंदन (११), आंचल (१२) आणि तृप्ती (११ ) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डुमरी गावात, एक महिला स्वयंपाकघरात सकाळी चहा करण्यासाठी गेली असता त्यावेळी अचानक या सिलींडरचा स्फोट होऊन ही भीषण घटना घडली. या घटनेत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. या कुटुंबातील कर्ता पुरूष मात्र बाहेर गेल्याने बचावला आहे.
Views:
[jp_post_view]