मेट्रोत महिलाराज ! हिजवडी- शिवाजीनगर मेट्रोत 100 महिला पायलटची होणार भरती…


पुणे: पुण्यातील प्रसिद्ध आयटी हब असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार आहे. ‘मेट्रो लाईन 3’ असं नाव असलेली ही मेट्रो पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी लवकरच मिटणार आहे. या मेट्रोच्या कामात आता एका परदेशी कंपनीची एंट्री झाली आहे. त्यानुसार कंपनीकडून आता हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरवर सर्व महिला मेट्रो पायलट ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कंपनीने अस म्हटलं आहे की, हा भारतातील एक अभूतपूर्व उपक्रम आहे. पुण्यातील मेट्रो लाईन 3 वरील सर्व गाड्या महिला पायलट चालवतील. यासाठी सुमारे 100 महिला पायलट्सची भरती केली जाईल. त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली जात आहे. दरम्यान हिजवडी ते शिवाजीनगरवर मेट्रो लाईन तीन धावणार असून
हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने एका फ्रेंच कंपनीसोबत करार केला आहे. पॅरिसस्थित ‘केओलिस’ ही फ्रेंच कंपनी पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं व्यवस्थापन करणार आहे. अल्स्टॉम कंपनीच्या मेट्रो गाड्यांची देखभाल आणि 23 स्टेशन्सवरील तिकीट व्यवस्थेची जबाबदारी केओलिस कंपनीकडे असेल. त्यानुसार या मेट्रोमध्ये आता 100 महिला पायलटची भरती होणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!