महिला व बालविकास मंत्री ‘बेपत्ता’! काम नसेल तर राजीनामा द्या; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सुनावलं


पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर महिलांच्या फसवणुकीच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. या सर्व प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना चांगले सुनावले आहे. महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, शोषण रोखण्यासाठी महायुतीमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय काम करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या एक्स पोस्टवर आदिती तटकरे यांचा फोटो शेअर करत, या आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना! आदिती तटकरे! राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत, याकडे वेधलं.’मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्या अंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, ही प्रकरणं समोर येत आहेत. पण, आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत,’ असा घणाघात सपकाळ यांनी केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना, जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे, हेच समजत नसेल, तर यांनी राजीनामे देऊन घरी बसावं. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा. उगाच मंत्रीपदाची खुर्ची उबवू नये, असा टोला देखील लगावला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी समाज माध्यमांवरून मंत्री तटकरे यांना डिवचलं असल्याने, त्यावर सत्ताधाऱ्यांकडून कशापद्धतीने प्रत्युत्तर दिलं जातं, विशेष करून आदिती तटकरे काय रिअॅक्शन देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!