नायगाव येथे पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ! आरोपींवर कठोर कारवाईची मागणी !!.
उरुळी कांचन
: माहेरहून पैसे आणण्यासाठी महिलेचा शारीरिक छळ केल्याने या छळाला कंटाळून नायगाव (ता. हवेली) येथील विवाहीतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
स्नेहल मयूर चौधरी (वय – २९, रा. नायगाव, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ इंद्रजीत नारायण कांचन (वय २७, रा. उरुळी कांचन) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहलचा पती मयूर चौधरी याचा सिमेंटचे पाइप तयार करण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायात तोटा झाल्याने त्याने स्नेहलला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली होती. भावाने घरातील दुभती गाय विकून मयूरला दोन लाख रुपये दिले होते. त्यानंतरही मयूरने पैसे आणण्यासाठी स्नेहलकडे तगादा लावला होता.
दरम्यान, या छळाला कंटाळून स्नेहलने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.