शिंदे गटाच्या बड्या मंत्र्याच्या मुलावर महिलेचे गंभीर आरोप, शारीरिक संबंध, गर्भधारणा आणि…!! राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

मुंबई : कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरु आहे. जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने कायदेशीर नोटीस बजावून सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला, असा आरोप महिलेने केला आहे. सिद्धांतच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली.
याबाबत महिलेने माहिती दिली आहे. दोघांमध्ये चेंबूर येथील एका फ्लॅटवर शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली होती. मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने केला आहे. यामुळे आता या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
महिलेने आपल्या तक्रारीत सिद्धांत शिरसाट यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.
त्यांच्यावरील कारवाईत राजकीय दबावामुळे होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई, असेही ते म्हणाले. यामुळे मात्र मंत्री संजय शिरसाट चांगलेच अडचणीत आले असून याबाबत त्यांनी अजून कोणती प्रतिक्रिया दिली नाही.