महिला दिनाला गालबोट!! पोलिसाकडून महिलेला बोलावून घेत केला बलात्कार, घटनेने राज्यात खळबळ…

बीड : महिला दिनानिमित्त एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत तपास सुरू आहे. पोलिसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा रक्षकच भक्षक झाल्याचे चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे. घडलेल्या घटने संदर्भात पाटोद्यात संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. याबाबत महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती.
यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यातून ओळख निर्माण झाली होती. या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले होते. यावेळी स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला.
महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला. यामुळे ही महिला घाबरली. मात्र नंतर ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येवून स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर घटना सांगितली. यामुळे मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती. नंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासा संदर्भात सुचना केल्या आहेत. याबाबत तपास सुरू आहे.