पुण्यात कार पार्किंगच्या वादातून महिलेचा विनयभंग


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार पार्किंगच्या वादातून महिलेच्या कानशिलात लगावत विनयभंग केल्याची घटना पुण्यातील साळुंके विहार येथे उघडकीस आली आहे.

 

याबाबत 38 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील साळुंके विहारमधील एका सोसायटीत राहणार्‍या महिलेची कार पार्क करत असताना, कारचा धक्का शेजारील घराच्या गेटला लागला.

 

त्यावरून रिकव्हरी एजंटने महिलेच्या कानशिलात लगावली व तिची गचंडी पकडून झटापट करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महिलेस डाव्या कानास ऐकू येत नसल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

 

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक एम सुरवसे पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणी रिकव्हरी एजंटला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुरुवारी दिली. विश्‍वास भापकर असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!