धक्कादायक! कुरकुंभ एमआयडीतील कंपनीमध्ये महिलेचा विनयभंग, शारीरिक संबंध ठेवण्याची केली मागणी आणि….
दौंड : कुरकुंभ एमआयडीसीतील एका कंपनीतील कंत्राटदारांच्या सुपरवायझरने कंत्राटी कामगार असलेल्या एका महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, सुपरवायझर किरण गोरड (पूर्ण नाव पत्ता नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गोरड हा फिरंगाई काॅन्ट्रॅक्टमधील सोड्यासको प्रायव्हेट लिमिटेडचा सुपरवायझर आहे. फिरंगाई काॅन्ट्रॅक्टमार्फत कंत्राटी पध्दतीने पीडित महिला टेलरिंग कामासाठी कामाला आहे.
पीडित महिला काम करीत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत किरण गोरड याने पीडितेला अंगावर ओढून घेऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार बाहेर कोणाला सांगितल्यास कामावरून काढून टाकू अशी धमकी दिली. तु मला काॅल व मेसेज करत जा असे म्हणून तो निघून गेला.
कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने हा प्रकार पीडितेने कोणाला सांगितला नाही. किरण गोरड पीडितेला वारंवार त्रास देत होता. याबाबत पीडित महिलेने कंपनीचे एच.आर. व महिला कमिटीकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माफी मागितली.
घडलेला प्रकार १२ जुन २०२३ रोजी पीडित महिलेने सांगितला. एच.आर यानी लेखी अर्ज देण्यास सांगितला. १३ जुन २०२३ लेखी अर्ज केला. एच.आर. विकास शिंदे व महिला कमिटीने दोघांचे अर्ज वाचून परत कळवितो असे सांगितले. पीडित महिलेने पुन्हा विचारणा केल्यावर ९० दिवसांचा कालावधी लागेल, वाट बघावी लागेल असे सांगितले.
किरण गोरड याच्यावरील कारवाईबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन करण्याबाबत फलक लावला. यानंतर चर्चा करून हे प्रकरण मिटविण्यास सांगितले. परंतू त्यास नकार देत महिलेने दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.