पुण्यात स्विगीच्या डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग, घाणेरड कृत्य करत म्हणाला, तुम…करोगी?
पुणे : डिलिव्हरी घेवुन आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने महिलेला तुम सेक्स करोगी? असे विचारुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी वाकडेवाडी येथील एका २६ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्विगीच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वीगी वरुन त्यांचे घरगुती सामानाची ऑर्डर केली होती. आलेले सामान तपासत असताना त्यात सॅनटरी पॅडची पॅकिंग फोडलेले दिसल्याने त्यांनी फाटलेल्या सॅनटरी पॅडचा फोटो स्वीगीला पाठविला.
कंपनीने सॅनिटरी पॅड घेऊन नवीन डिलिव्हरी बॉयला त्यांच्या पत्त्यावर पाठविले. आरोपी डिलिव्हरी बॉयने फिर्यादीस नवीन पॅड देऊन पेमेंटबाबत विचारणा केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास स्विगीशी बोलून घ्या, असे सांगितले.
त्यानंतर डिलिव्हरी बॉयने मोबाईल फोन चार्जिगचे निमित्त करुन फिर्यादीचे घरात प्रवेश केला. फिर्यादीला तुम सेक्स करोगी? असे म्हणून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करुन अश्लिल हावभाव करुन त्यांचा विनयभंग केला.
दरम्यान, याप्रकरणी वाकडेवाडी येथील एका २६ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्विगीच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.