दिरासोबत अनैतिक संबंधातून महिलेने पतीचा केला खून, गुन्हा लपवला पण पोलिसांनी केला आरोपींचा कांड उघड….

कोल्हापूर : अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कागल तालुक्यातील वडगावजवळ ही घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.
शिवाजी बंडा शिंदे (वय ४७, रा. वडगाव) यांच्या डोक्यात वार करून मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला स्थानिकांच्या निदर्शनास आला. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी अवघ्या आठ तासांमध्ये या खुनाचा छडा लावला आहे. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत. मृतदेह पाहिल्यानंतर हा अपघात असावा असे भासवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.
असे मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास करत चौकशी केली असता हा खून असल्याचे उघड झाले. पत्नीने चुलत दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून केल्याच स्पष्ट झालं असून मात्र याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा शिंदे यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, कागल तालुक्यातील वडगाव येथे मृत शिवाजी बंडा शिंदे याचा खून करून रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकल्याचे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. स्थानिकांनी पोलीस पाटलाच्या मदतीने मुरगूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली.
कांचन व चंद्रकांत यांनी महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून शिवाजीच्या डोक्यात लाकडी ओंडक्याने मारून गंभीर जखमी केलं. यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय बळवल्यानंतर चंद्रकांत शिंदेला ताब्यात घेत त्याला खाकीचा धाक दाखवताच गुन्हा उघड झाला.