1 मार्चपासून तुमचं बजेट कोलमडणार की सावरणार? रेल्वे, गॅस आणि UPI, Whats app बदल जाणून घ्या….


मुंबई : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आर्थिक नियमांमध्ये काही ना काही बदल होत असतात. आता 1 मार्च 2026 पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ज्यामध्ये घरगुती गॅस, रेल्वे तिकिट बुकिंग, व्हाट्सअप बाबतचे सिम वापराचे नियम, यूपीआय व्यवहार आणि बँक खात्यातील किमान शिल्लक यांचा समावेश आहे. त्यामुळे या महिन्याचा सामान्य माणसांचं बजेट वाढणार की दिलासा मिळणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी 1 मार्चपासून महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. यामध्ये जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग प्रक्रियेत सुधारणा केली जाणार आहे. भारतीय रेल्वे जुन्या यूटीएस अॅपऐवजी ‘RailOne’ नावाचे नवे अॅप पूर्ण क्षमतेने सुरू करणार आहे. या नव्या अॅपद्वारे जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि स्थानिक प्रवासाशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.

बँक खात्यांबाबतही नियमांमध्ये बदल होणार आहेत. काही सरकारी बँका किमान शिल्लक नियमात सुधारणा करणार आहेत. पूर्वी एका दिवशी शिल्लक कमी असल्यास दंड आकारला जात असे; आता सरासरी मासिक शिल्लक या निकषावर शुल्क आकारले जाणार आहे.

दर महिन्याला एलपीजी गॅसच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता कायम असते. मागील काही महिन्यांपासून व्यवसायिक सिलेंडरच्या दरात चढ-उतार दिसून आला आहे. गेल्या महिन्यात सुमारे ४९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मार्च महिन्यातही दर बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी यूपीआय प्रणालीतही बदल अपेक्षित आहेत. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी केवळ यूपीआय पिन पुरेसा राहणार नाही. त्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी किंवा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू केले जाऊ शकते. तसेच व्हाट्सअप हे सिम कार्ड शिवाय चालणार नाही.

येत्या एक मार्चपासून मोबाईल सिम,बँकिंग, एलपीजी गॅस आणि रेल्वे तिकिटाची संबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आता थेट परिणाम होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!