राजीनामा देणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपला वैरी….; नरहरी झिरवळानीं स्पष्टच सांगितलं


पुणे : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे मंत्री नरहरी झिरवळांच्या यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता खुद्द झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाला मंत्रीपदावर ठेवायचे हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माझे कोणीही वैरी नाहीत,असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांनी असे म्हटले आहे की,मंत्रालयात घडलेला हा प्रकार अत्यंत दयनीय असून हे प्रशासनाला कलंक लावणारं वर्तन आहे. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री महोदयांना कोणाला मंत्रिपद द्यायचे आणि कोणाचे काढायचे, हा सर्वस्वी अधिकार आहे,असे ते म्हणाले.

या लाचखोरीं प्रकरणानंतर मंत्री झिरवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माझे कोणीही वैरी नाहीत,असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.पोलीस कोठडीत असलेल्या ढेरंगे यांनी ही लाच स्वतःसाठी घेतल्याची कबुली दिली आहे. यामध्ये माझ्या कोणत्याही ओएसडीचा (विशेष कार्य अधिकारी) सहभाग नसल्याच त्यांनी स्पष्ट केल आहे..

दरम्यान मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरे यांने 35 हजार रुपयाची लाच घेताना त्याला लासलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. तो लिपिक झिरवळ यांच्या कार्यालयात कामाला होता. त्यामुळे त्यांचे नाव जोडले गेले असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!