मोठी बातमी! VSR चे मालक रोहित सिंग यांना अटक होणार? व्हिडीओ बाहेर येताच महत्वाची माहिती आली समोर…


पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानतंर आता या अपघाताभोवतीचे गूढ अधिक गडद झाले आहे.

अजित पवारांच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर आता त्यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

वीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर विमान उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत, या निष्काळजी प्रकरणी त्यांना अटक करा, असं लिहित दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

माझ्या वडिलांना आपण गमावलंच, आता एका मुलाची आर्त हाक आहे, असं सांगत जय पवार यांनी डीजीसीएकडे कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे जय पवार यांनी स्पष्ट केलेलं नाही.

जय पवार यांची पोस्ट काय?

माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असं जय पवार यांनी लिहिलं आहे.

मी डीजीसीएला ठामपणे मागणी करतो, की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावी, रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी आग्रही मागणी जय पवार यांनी केली आहे. ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी अशी भावनिक सादही जय पवारांनी घातली आहे.

दरम्यान जय पवार यांच्या या पोस्टनंतर आता व्हिएसआर कंपनीवर टीकेची झोळ उठताना दिसत आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

तसेच याप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे आता जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर तरी दोषींवर गुन्हा दाखल होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!