भारतावर पुन्हा मोठा ब्लास्ट होणार? 300 किलो स्फोटकांचं संकट, नव्या माहितीने उडाली खळबळ…

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आय20 कारमध्ये मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. दरम्यान, या हल्ल्यामागे दहशतवादी हट होत हे आता जपळपास उघड झाले आहे.

तसेच या प्रकरणाचे एकूण पाच डॉक्टरांशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता पोलीस या प्रकरणचा तपास करत असले तरी अजूनही एक संकट संपलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार अजूनही भारतात कुठेतरी तब्बल 300 किलो अमोनियम नायट्रेट कुठेतरी लपवून ठेवण्यात आलेले आहे. ज्या लोकांजवळ हे स्फोटक आहे, त्यांचा शोध घेणे अजूनही बाकी आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचा लक्ष लागलेले असून स्फोटांची दहशत अजूनही कायम आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात झालेल्या कारवाईत आतापर्यंत 2,900 किलो अमोनियम नायट्रेट स्फोटक जप्त करण्यात आले आहे. पण अजूनही 300 किलो स्फोटक बेपत्ता आहे. हे स्फोटक देशात कुठेतरी लपवले गेले असून, त्याचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि गुप्तचर विभाग एकत्रित मोहीम राबवत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही स्फोटकं बांगलादेश मार्गे नेपाळात आणण्यात आली आणि तिथून भारतात तस्करी करण्यात आली. तपासात उघड झाले आहे की खत उत्पादन करणाऱ्या एका कंपनीतून 3200 किलो अमोनियम नायट्रेट चोरी करण्यात आले होते. त्यापैकी 2900 किलो जप्त करण्यात आले असले तरी उर्वरित 300 किलो अजूनही गायब आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळ-भारत सीमेवर उच्चस्तरीय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहिना शाहिद या डॉक्टरबद्दल मोठा खुलासा झाला आहे. ती फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. डॉ. शाहिनाने अयोध्या आणि काशी परिसरात स्लीपर सेल सक्रिय ठेवले असल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे हा हल्ला केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून, देशातील धार्मिक स्थळांवर मोठ्या कटाची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या स्फोटानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळ, मंदिर, आणि सरकारी इमारतींमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने NIA आणि IB ला तत्काळ तपास गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, भारतातील सर्व खतनिर्मिती कंपन्यांवरही सुरक्षा पुनरावलोकन सुरू करण्यात आले आहे.
सध्या देशातील सर्व सुरक्षा संस्था 300 किलो हरवलेल्या स्फोटकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत आहेत. या स्फोटकांचा मागोवा लागला नाही, तर देशात पुन्हा मोठा हल्ला होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशभरात नागरिकांनाही संशयास्पद हालचालींबद्दल पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
