पंकजा मुंडेंना अजून एका पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर, स्वीकार केल्यास होणार राजकीय भूकंप?
पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव यांच्या बीआरएस पक्षाकडून पंकजा यांना पक्षात येण्याचं आवाहन केल्यानंतर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवेसी यांनीही पंकजा मुंडे यांना दिलेल्या जुन्या ऑफरची पुन्हा आठवण करून दिली आहे.
यामुळे आता पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना दोन वर्षांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
काही लोकांना हवेचा सुगंध आल्यावर पाऊस केव्हा येणार हे कळतं. मात्र त्याच्यापूर्वीच इम्तियाज जलील यांना कळतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांना इम्तियाज जलील यांनी ही ऑफर आधीच दिली आहे.
भाजपमध्ये घुसमट होणाऱ्या पंकजा मुंडे यांनी विचार करावा,’ असा सल्ला असदुद्दीन ओवेसी यांनी पंकजा मुंडे यांना दिला. यामुळे आता पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आषाढी वारीचे औचित्य साधून मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वात 27 जून रोजी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी ते शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.