जिल्हा परिषदेचा आजपासून बिगुल वाजणार? निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक समोर…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात निवडणुका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या राज्य निवडणूक आयोगाकडून आज याबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाला 15 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे. यामुळे ज्या 12 जिल्हा परिषदांचे आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत आहे, त्यांच्या निवडणुक कार्यक्रम आज घोषित केला शकतो.

या निवडणुकांच्या घोषणेसोबतच संबंधित 12 जिल्ह्यांमध्ये तातडीने आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणूक आयोगाकडून अपेक्षित असलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 19 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत पार पडू शकते. त्यानंतर अर्जांची छाननी 29 आणि 30 जानेवारी रोजी केली जाईल.

ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांना 2 फेब्रुवारी पर्यंत मुदत असेल, तर 3 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. प्रत्यक्ष मतदान 12 किंवा 13 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता असून, 14 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल.

दरम्यान, या पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या 12 जिल्हा परिषदांसह त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!