पुण्यात ठाकरे गटाला बसणार धक्का? माजी आमदाराने घेतली चंद्रकांत पाटलांची भेट..
पुणे : सध्या ठाकरे गटातून अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. असे असताना आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपमध्ये २०२४ पर्यंत अनेक मोठे नेते येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.
त्यांनतर आता लगेचच दोनच दिवसांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे पुण्यात चर्चा सुरू आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली.
ही भेट राजकीय नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. तरीदेखील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरे गटाला पुन्हा धक्का देण्याची तर ही तयारी ना? अशा चर्चा रंगल्या आहेत.