प्रजासत्ताक दिनी शेअर बाजार खुले राहणार की बंद?, ट्रेडिंग करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा…

नवी दिल्ली : आज 26 जानेवारी रोजी, भारत 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या राष्ट्रीय सुट्टीमुळे भारतीय शेअर बाजार पूर्णपणे बंद राहतील. या राष्ट्रीय सुट्टीमुळे आज, 26 जानेवारी 2026 रोजी देशातील शेअर बाजारांमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना आज शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाहीत.
आजच्या सुट्टीमुळे इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज तसेच सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग या सर्व विभागांमध्ये व्यवहार स्थगित राहतील. याशिवाय, मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरही कोणतेही कमोडिटी ट्रेडिंग होणार नाही. म्हणजेच सोने, चांदी, कच्चे तेल किंवा इतर वस्तूंमध्ये गुंतवणूक आज करता येणार नाही

दरम्यान, शेअर बाजार मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी नेहमीच्या वेळेत पुन्हा सुरू होतील. सकाळी 9 वाजता प्री-ओपन सत्र सुरू होईल आणि नियमित व्यवहार सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 पर्यंत चालतील. सर्व विभागांमध्ये व्यवहार सुरळीतपणे सुरू होतील, असा अंदाज आहे.
