रक्ताचे नमुने बदलणारा डॉक्टर सगळंच बाहेर काढणार, त्या लोकप्रतिनिधीचे नावही येणार समोर? तपासला वेगळं वळण…


 पुणे : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहे. यात अनेक जण गोत्यात येत आहे, पुणे पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससुनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक केली आहे.

ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी हे नमुने बिल्डर विशाल अगरवाल याच्या मुलाला वाचवण्यासाठी कचऱ्यात फेकल्याचे तपासात पुढे आले आहे.

पोर्शे कार अपघात झाल्यापासून आतापर्यंत या प्रकरणात सुरुवातीचा तपास,दाखल केलेले गुन्हे, कारवाई ही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आधी पोलिसांना निलंबित केल्यानंतर ससूनच्या डॉक्टरांना अटक केली करण्यात आली आहे.

डॉक्टर अजय तावरे याने पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी मी सर्वांचीच नावे घेणार असे सांगितले आहे. आता तावरेने हा इशारा नेमका कुणाला दिला आहे, याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच तावरे कोणाची नावे घेणार? या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याने अजय तावरेशी संपर्क साधला. तेव्हा फोनवरून लोकप्रतिनिधीने अजय तावरेला रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितल्याचं तपासात समोर आले आहे. आता हा लोकप्रतिनिधी कोण? पोलिसांना जर नाव समजलं आहे तर ते समोर का आणलं जात नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!