अजित पवारांच्या विमान अपघाताच कोडं ‘या’ ४ मुद्यांवर उलगडणार? तपासाची चक्रे फिरली…..


मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तपासाची चक्रे आता वेगाने फिरली आहेत.ही केवळ तांत्रिक दुर्घटना होती की यामागे काही मानवी चुका होत्या, याचा उलगडा करण्यासाठी यंत्रणांनी कंबर कसली आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रामुख्याने चार मोठ्या मुद्यांवर चौकशी केंद्रित करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,अजित पवार ज्या विमानात बसले होते ते VSR व्हेंचर्स कंपनीचे विमान आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लॅकलिस्टेड असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या कंपनीचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता महत्त्वाच्या चार मुद्द्यावर विमान अपघाताच कोडं उलगडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१. तांत्रिक बिघाड – उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानात बसले त्या विमानाच्या इंजिनमध्ये किंवा नियंत्रण प्रणालीत उड्डाणादरम्यान काही बिघाड झाला होता का? या मुद्यावरही तपास सुरू आहे.

२. वैमानिकाची चूक -विमान लँडिंग होण्याआधी पायलटने दृष्यमानतेचे कारण देत पहिल्या प्रयत्नात लँडिंग टाळले होते. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा अपघात झाला. त्यामुळे विमानाचे लँडिंग करताना वैमानिकाकडून काही तांत्रिक निर्णय चुकले का? याचाही तपास होणार आहे..

३. प्रतिकूल हवामान -अपघाताच्या वेळी बारामतीमधील हवामान आणि दृश्यमानता कशी होती? त्याचा लँडिंगवर परिणाम झाला का? खराब हवामान हेच अपघाताचे कारण ठरले का, हा मुद्दादेखील कळीचा ठरणार आहे.

४. लँडिंगमधील त्रुटी – विमान दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या ‘गो-अराउंड’ प्रक्रियेत नेमकी काय चूक झाली? पायलटकडून लँडिंग करताना मोठी चूक झाली का, याचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर लगेचच AAIB च्या दिल्ली मुख्यालयातील आणि DGCA च्या मुंबई कार्यालयातील पथके बारामतीमध्ये दाखल झाली आहेत. त्यांनी अपघातस्थळावरून विमानाचे अवशेष, ब्लॅक बॉक्स आणि इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. यावरून आता अपघाताचं कोडं उलगडणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!