बारामतीत रुग्णालयाला अजित पवारांचे नाव, अहिल्यादेवी होळकरांचे नाव हटवले गेल्याने वाद वाढणार?


बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय; तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

या नामकरणानंतर संबंधित संकेतस्थळे, अभिलेखे, नोंदवही, फलक, अधिकृत पत्रव्यवहार व इतर कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईचे आयुक्त; तसेच संबंधित संस्थांचे अधिष्ठाता यांच्यावर सोपवली आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या तीन जानेवारी २०१३च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर २० जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी ३१ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती’ असे केले होते. ते आता बदलून अजित पवार यांचे नाव त्यास दिले जाईल. या नव्या निर्णयाने वाद निर्माण होण्याची शक्यता असून काही संघटनांकडून नाव बदलण्याच्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी…

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. अजित पवार 66 वर्षांचे होते. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

अजित पवारांच्या मृत्यूनंतर हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी मोठी मागणी केली आहे. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारामती विमानतळाचे नामकरण ‘अजित पवार विमानतळ, बारामती’ असे करण्यात यावे, अशी मागणी हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!