बारामतीत आमराईमधून सोनू भैय्या साबळे गेम फिरवणार? रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, दिग्गजांचे टेंशन वाढलं…


बारामती : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधील आमराई परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगरसेवक पदाचे उमेदवार सोनू भैय्या साबळे यांना नागरिकांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

अलीकडेच आमराई भागात घेतलेल्या दौऱ्यात आणि रॅलीमध्ये शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन सोनू भैय्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.

सामाजिक कामात सातत्य, नम्र स्वभाव आणि युवकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे साबळे यांच्याविषयी लोकांमध्ये नैसर्गिक विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीत स्थानिक रहिवाशांनी केलेले स्वागत आणि पाठिंबा त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत आहे. यामुळे लढत चुरशीची होणार आहे.

रॅलीनंतर मतदारांशी संवाद साधताना सोनूभैय्या साबळे म्हणाले, आमराईकरांनी आज दाखवलेला विश्वास हे माझं सर्वात मोठं बळ आहे. हा प्रेमाचा, आश्रयाचा आणि अपेक्षांचा वारसा मी मनापासून जपेन. तुमचे प्रत्येक मत प्रभागाच्या विकासाचा मार्ग अधिक मजबूत करणार आहे.

तसेच पाणी, रस्ता, स्वच्छता, स्ट्रीट लाइट्स, महिला व वृद्धांसाठी सुविधा आणि युवकांना संधी, या क्षेत्रात ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी पुन्हा अधोरेखित केला. याठिकाणी अनेकांना मदत केल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आता सार्वजनिक कामे देखील पूर्ण करायची आहेत.

आमराईसह संपूर्ण प्रभाग 13 मध्ये सोनू भैय्यांना जोरदार पाठींबा मिळत असून, लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रभागात सकारात्मक आणि बदल घडवणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा असलेल्या मतदारांमध्ये सोनू भैय्या साबळे यांची उमेदवारी आशेचा किरण बनत आहे. यामुळे येथील लढतीकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!