शरद पवार राज्यसभेवर जाणार? भाजप मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, आघाडीला धक्का बसणार….

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीच्या सहा जागा निश्चित असून सातवी जागा महाविकास आघाडी जिंकू शकते.आघाडीकडून जर स्वतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार उमेदवार असतील, तरच महायुती ही निवडणूक बिनविरोध करण्यास संमती देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव आघाडीवर आहे.मात्र यावरून महाविकास आघाडीत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यात स्वतः शरद पवार उमेदवार असतील, तरच महायुती ही निवडणूक बिनविरोध करण्यास संमती देऊ शकते. मात्र, पवारांऐवजी मविआने दुसरा कोणताही चेहरा समोर आणला, तर भाजप सातवी जागा लढवण्यावर ठाम आहे. अशी माहिती समोर आली आहे.
राज्यसभेच्या या सातव्या जागेसाठी महायुतीला मतांची जुळवा जुळव करावी लागेल, मात्र भाजपने त्यासाठी कंबर कसली आहे. जर महाविकास आघाडी कडून शरद पवार नसतील तर भाजप मोठी चाल खेळण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे या निवडणुकीत 2022 मधील निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान महायुतीने राज्यसभेतील सातवी जागा लढवल्यास 2022 मधील राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.