अखेर ठरलं! ‘त्या’ लाडक्या बहिणींकडून वसुली करणार, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

त्र, या योजनेच्या निकषात न बसताही काही महिला योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. इतकेच नाही तर काही पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेनंतर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. या योजनेच्या संदर्भात आम्ही राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून आकडेवारी गोळा करत आहोत.

दरम्यान, या आकडेवारीच्या आधारावर स्थानिक पातळीवर छाननी करण्यात येत आहे. अपात्र लाभार्थ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल आणि पैशांची वसुली केली जाईल अशी माहिती मंत्री अधिती तटकरे यांनी दिली आहे.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेची सुरुवात २८ जून २०२४ रोजी झाली. या योजनेच्या अंतर्गत २.६३ कोटी महिलांनी नोंदणी केलेली आणि त्यापैकी २.४७ कोटी महिलांना लाभ दिला जात आहे. सरकारकडून अर्जांची छाननी करण्यात येत आहे.
जानेवारी महिन्यात कृषी विभागाकडून आकडेवारी आली. त्याची छाननी करण्यात आली. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यातून १ हजार तर लाडकी बहीण योजनेमधून ५०० रुपये अशा प्रकारे दीड हजारांचा लाभ दिला जात आहे. आता पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.