काँग्रेसच ठरलं! पुण्यात रवींद्र धंगेकरच असणार लोकसभेचे उमेदवार? चर्चांना उधाण…!


पुणे : पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणुक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी सुरू झाली आहे. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपाचे टेन्शन वाढणार आहे. सध्या धंगेकर यांची लोकप्रिय वाढली आहे.

कसब्यात त्यांनी इतिहास घडवला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याने रवींद्र धंगेकर चांगलेच चर्चेत आहेत. आता येत्या सहा महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

दरम्यान, धंगेकर यांनी याबाबत काही माहिती दिली नाही. मात्र यामध्ये ते जर उमेदवार असतील तर ही लढत जोरदार होईल, तसेच काँग्रेसला बळ देखील मिळेल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!