पराभव जिव्हारी!राज ठाकरे भाकरी फिरवणार, पक्ष कार्यकारणीत मोठे बदल होणार?


पुणे: पुणे महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲक्शन मोडवर आली आहे. हा पराभव जिव्हारी लागल्यानंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.

पुणे महापालिकेत एकेकाळी 29 नगरसेवक असलेल्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत मात्र एकही नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे पुण्यातील शहर कार्यकारणीमध्ये लवकरच बदल होण्याचे संकेत वरिष्ठांकडून मिळालेले आहेत.याबाबत पक्षाचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी माहिती दिली आहे.

ते म्हणाले, यंदा आम्ही पहिल्यांदाच शिवसेनेसोबत युतीमध्ये लढलो. पराभव आम्ही मान्य केला असून लवकरच त्याबाबत आत्मचिंतन केलं जाईल. तसेच राज साहेब आणि शर्मिला वहिनी यांच्याशी बोलल्यानंतर शहरात बदल दिसेल असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखायला आम्ही कमी पडलो. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध धनकशक्ती होती असं असलं तरी सुद्धा येत्या काळात आदरणीय राज साहेब लवकरच पुण्यात येतील आणि बैठक घेतील अशी माहिती त्यांनी दिली.

केवळ शहराध्यक्ष नव्हे तर संपूर्ण शहर कार्यकारणी मध्ये फेरबदल होण्याची शक्यता वरिष्ठांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरे पुण्यात भाकरी फिरवत नव्या चेहऱ्यांना संधी देणार का? जुनी जबाबदारी बदलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!