पेट्रोल – डिझेल स्वस्त होणार?कच्च्या तेलाचे दर १८ रुपये प्रति लिटर होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणारा अंदाज

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल- डिझेलच्या किमतीत चढउतार होताना दिसत आहे. अशातच जागतिक ब्रोकरेंज कंपनी.जेपी मॉर्गनने मोठा अंदाज वर्तवला आहे.पेट्रोल डिझेलचे दर घसरणार असल्याची भविष्यवाणी या एजन्सीने केली आहे. २०२७ मध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति लिटर १८ रुपयांपेक्षा कमी होतील, असं सांगितलं आहे. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासाठी हा खूप दिलासा करणार आहे.
देशातील कोट्यवधी लोकांकडे वाहने आहेत. त्यातील अनेक लोक रोज खाजगी वाहनांनी प्रवास करतात. ऑफिस, कॉलेजला जाताना बाईक किंवा कार घेऊ जातात. रोज पेट्रोल आणि डिझेलसाठी पैसे मोजावे लागतात. सध्या पेट्रोलचे दर १०३ आणि डिझेल ९१ रुपयांवर विकले जात आहेत. दरम्यान, आता पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.जागतिक एजन्सी जेपी मॉर्गनने याबाबत भविष्यवाणी केली आहे. येत्या दोन वर्षात कच्चे तेल खूप स्वस्त होणार आहे. २०२७ पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलचे दर ३० डॉलर प्रति बॅरल होऊ शकतात.
भारतीय रुपयानुसार कच्च्या तेलाचे दर ९५ रुपये प्रति बॅरल होईल. एका बॅरलमध्ये १५९ लिटर कच्चे तेल असते. एका बॅरलची किंमत २८५० रुपये होईल. त्यामुळे एका लिटर कच्च्या तेलाची किंमत १७.९० रुपये होऊ शकते. हे दर एका पाण्याच्या बॉटलपेक्षा कमी आहे. पाण्याची बॉटल ही १८ ते २० रुपयांना मिळते.जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, कच्च्या तेलाचे हे दर भारतासाठी महत्त्वाचे आहे. भारत देश हा कच्च्या तेलावर अवलंबून आहे. भारत ८६ टक्के कच्चे तेल हे इतर देशांकडून घेतो. जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, ब्रेंट क्रूडच्या किंमती या ५० टक्के कमी होऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ६२ डॉलरवर विकले जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असणे हे कच्च्या तेलाच्या घसरणीमागचे कारण असू शकते.

