…त्याला सोडणार नाही!! कोरटकरच्या अटकेनंतर फडणवीस आक्रमक, केलं मोठं वक्तव्य

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल महिनाभरानंतर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तिकपणे कारवाई करत प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केली आहे.
अटकेनंतर आज त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले आहे. कोरटकरला कोल्हापुरात आणल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रेमींकडून आंदोलन केलं जात आहे.
शिवप्रेमींकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. पोलीस ठाणं आणि कोर्टाच्या बाहेरही लोकांची मोठी गर्दी जमली आहे. या गर्दीतून वाट काठत पोलिसांनी कोरटकरला न्यायालयात हजर केले आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. माझा सगासोयरा जरी अपराध करेल तरी त्याला सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. जो समाजाचा शत्रू असेल तर त्याला सोडणार नाही.
नाना पटोले म्हणतात कुंपण शेत खाते. पण आमच्याकडे कुंपणच नाही, शेत आहे… कोरटकर कुठे सापडला त्याला कोण आश्रय देत होतं, याचा शोध घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, असंही फडणवीस म्हणाले आहे.