अजित पवारांच्या विमान अपघाताचे नवे पुरावे समोर येणार? रोहित पवार पत्रकार परिषदेतून उलगडा करणार…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानानंतर ही घटना अपघात होती की घातपात याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी याआधीही पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या शंका बोलून दाखवल्या होत्या.आज पुन्हा एकदा या विषयावर ते पत्रकार परिषद घेणार आहेत . यातून ते अपघाताचे नवे पुरावे सादर करणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन 22 दिवस झाले तरी या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला नसल्याच रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून आणखीन काही पुरावे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या तपासावरही त्यांनी काही आरोप केले असून काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.तसेच काही मागण्याही केल्या आहेत. तपास यंत्रणांच्या कामावर त्यांचा आक्षेप नाही, मात्र ज्या गतीने हा तपास सुरू आहे त्या ‘स्पीड’वर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. पत्रकार परिषदांमुळे या प्रकरणाच्या तपासाला जोर येणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, दिल्लीत पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे अधिकारी खाजगी विमानाने बारामतीला पोहोचले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असल्यास म्हटले जात आहे. आता या पत्रकार परिषदेतून आणखीन काय नावे पुरावे समोर येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!