मोबाईलचा रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार? सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आली समोर..


नवी दिल्ली : एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया या तीन प्रमुख कंपन्या पुन्हा एकदा रिचार्ज दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. देशातील टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा आता ग्राहकांना स्वस्त सेवा देण्याऐवजी दरवाढीकडे वळली आहे

यामुळे आधीच महागाईच्या चक्रात अडकलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर आणखी ताण येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या कंपन्या दरवर्षी सुमारे २० टक्क्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत आहेत. यावर्षीही त्याच पद्धतीने दर वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यामध्ये विशेषतः मध्यम ते उच्च श्रेणीतील प्लॅन (₹३०० पेक्षा जास्त किंमत असलेले) महाग होण्याची शक्यता आहे, तर स्वस्त प्लॅनच्या किमतीत मोठा बदल होणार नाही असे दिसते. कारण, कमी किमतीचे प्लॅन महाग केल्यास ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे नंबर पोर्ट करण्याची शक्यता वाढते.

ईटी टेलिकॉमच्या अहवालानुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया मोबाईल टॅरिफमध्ये १० ते १२ टक्के वाढ करू शकतात. जरी कंपन्यांकडून यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नसले तरी, युजर्समध्ये दरवाढीबाबत चिंता वाढत आहे. विशेषतः दोन सिम वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त आर्थिक फटका बसणार आहे.

गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये या तिन्ही कंपन्यांनी ११% ते २३% इतकी मोठी दरवाढ केली होती. जर यावर्षीही १२% दरवाढ झाली, तर ₹१०० चा प्लॅन ₹११२ ला मिळेल. ही वाढ लहान वाटली तरी, वारंवार रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांच्या वार्षिक खर्चात मोठी भर पडणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!