मोठी बातमी! माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार?, महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून आपल्या पडला शोभेल असे वागत नसल्याचे दिसून आले आहे. ते शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करण्यात आणि सभागृहात बसून ऑनलाइन रमी खेळण्यात व्यस्त आहेत.

कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याचे अनेक आरोप लागले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असून, ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले आहेत, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये २५ मिनिटं चर्चा झाली, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, मात्र या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाहीये. फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
