इराण- इस्त्राईलच्या युद्धाची झळ आता भारतीय शेतकऱ्यांना, रासायनिक खतांचा तुटवडा होणार?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्त्राईलच्या युद्धाची झळ आता भारतापर्यंत येऊन पोहोचली आहे. या युद्धाचा परिणाम आता भारतातील शेतकऱ्यांवर होणार आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खताच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यावर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर खत पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना केंद्रीय खत विभागाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.आपल्या देशात सध्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांच्या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही, असे केंद्रीय खत विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच त्यांच्याकडून खतसाठ्याची आकडेवारी देखील स्पष्ट केली आहे.

खत मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या देशात एकूण 177.31 लाख टन खतांचा साठा उपलब्ध आहे. या साठ्यात विविध प्रकारच्या खतांचा समावेश असून युरिया, डीएपी आणि संयुक्त खतांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 59.30 लाख टन युरिया उपलब्ध आहे, तर डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताचा साठा सुमारे 25.13 लाख टन आहे. याशिवाय सुमारे 55,87 लाख टन संयुक्त खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

जागतिक खत व्यापारातील सुमारे 33 टक्के व्यापार हा या मार्गातून होतो. त्यामुळे या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास अनेक देशांच्या खत आयातीवर परिणाम होऊ शकतो. भारतही मोठ्या प्रमाणात खत आयात करत असल्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मात्र आता केंद्रीय खत विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर शेतकऱ्यांना रासायनिक खताच्या तुटवड्यात कोणताही अडथळा येणार नसल्याची शक्यता समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!