तब्बल 13 वर्षांनंतर इंदापूरला मिळणार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद? महत्वाची नावे आली समोर..


इंदापूर : राज्यात नुकताच जिल्हा परिषदेचा व पंचायत समितीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये अनेक ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारली असली तरी पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लोकांची सहानुभूती देखील मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद कोणाला मिळणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळवण्यासाठी इंदापूर बारामती आणि दौंड हे तालुके आग्रही आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्याला अध्यक्ष पद मिळाले नसल्याने आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इंदापूर तालुक्यातच मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत 2012-13 या काळात इंदापूरचे दत्तात्रय भरणे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा इंदापूरला अध्यक्ष पद मिळाले नाही. यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता पाटील यांना अध्यक्ष पद मिळावे, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांची आहे.

अंकिता पाटील यांनी गेल्या काही वर्षात शिक्षण रोजगार तसेच सामाजिक प्रश्नाबाबत नेहमीच सर्वसामान्यांना अनुकूल अशी भूमिका घेतली. बावडा या त्यांच्या जिल्हा परिषदेच्या गटात तरुणांना रोजगार शिक्षण तसेच खेड्यापाड्यातील गावांमध्ये लक्ष देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणला.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या त्या कन्या आहेत. यामुळे सध्या त्यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच बारामतीमध्ये करण खलाटे दौंडमध्ये वीरधवल जगदाळे यांची देखील नावे चर्चेत आहेत. यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सूत्रे कोण हातात घेणार याबाबत अजून निर्णय झालेला नाही. हा निर्णय लवकरच झाला तर या जिल्हा परिषदेच्या तसेच इतर पदाधिकारी नियुक्त देखील लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत. यामुळे लवकरच पक्ष पातळीवर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!