कामाची बातमी! होम लोनचा EMI कमी होणार का? RBI ने दिली महत्वाची बातमी, जाणून घ्या…


पुणे : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच पतधोरण बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँक ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता तो 5.25 टक्क्यांवरच कायम ठेवला आहे.

या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा पर्सनल लोन घेतलेल्या ग्राहकांना सध्या तरी दिलासा मिळालेला नाही. कारण रेपो रेट स्थिर राहिल्याने बँकांच्या कर्जावरील व्याजदरात तातडीने कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे. परिणामी, कर्जदारांना अपेक्षित असलेली EMI कमी होणार नाही.

मॉनेटरी पॉलिसी कमिटी ने सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला असून, महागाई आणि आर्थिक स्थैर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

पतधोरण जाहीर करताना भारतीय रिझर्व्ह बँक ने इतर महत्त्वाचे दरही स्थिर ठेवले आहेत. ‘स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी’ (SDF) दर 5 टक्के तर ‘मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी’ दर 5.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय बँकेने आपला धोरणात्मक पवित्रा ‘न्यूट्रल’ ठेवत भविष्यातील आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची लवचिकता कायम राखली आहे. आरबीआयच्या मते भारतीय अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे. देशांतर्गत मागणी, खाजगी गुंतवणूक आणि वाढता उपभोग यामुळे अर्थव्यवस्थेला चांगला आधार मिळत आहे. मात्र जागतिक स्तरावरील तणाव आणि वाढता महागाईचा दबाव ही अजूनही मोठी आव्हाने ठरू शकतात.

जागतिक पातळीवरील संघर्ष आणि ऊर्जा संसाधनांच्या पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेता महागाई वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे ‘इम्पोर्टेड महागाई’चा दबाव वाढू शकतो.

भारतीय रिझर्व्ह बँक च्या मते, या परिस्थितीचा परिणाम देशाच्या व्यापार तुटीवर होऊ शकतो तसेच आर्थिक विकासाच्या गतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवत पुढील निर्णय घेतले जाणार आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!