बॉक्स ऑफिसवर इतिहास घडणार? ‘शोले’ आणि ‘मुगल-ए-आजम’चे विक्रम मोडणार? ‘धुरंधर 2’ चित्रपट पाहून या दिग्दर्शकाचं मोठं विधान…

मुंबई : बॉक्स ऑफिसवर 2025 मध्ये मोठा गाजलेला धुरंधर या चित्रपटाचा दुसरा भाग धुरंधर 2 आता 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या वाढत्या क्रेझमुळे निर्मात्यांनी एक दिवस आधी म्हणजे 18 मार्चपासून स्पेशल पेड प्रीव्ह्यू शो सुरू केले आहेत. अधिकृत प्रदर्शनाआधीच अनेक सेलिब्रिटींनी चित्रपट पाहिला असून त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे, प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत धुरंधर 2 हा केवळ एक चित्रपट नसून नव्या सिनेमॅटिक युगाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. तसेच, चित्रपटाच्या कमाईची क्षमता, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्याचा सामाजिक प्रभाव याबाबतही त्यांनी सकारात्मक मत व्यक्त केले आहे.

जरी धुरंधर 2 या चित्रपटाला सेलिब्रिटींकडून मोठे कौतुक मिळत असले, तरी अंतिम निकाल हा प्रेक्षकांच्याच हातात असणार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला नेमका कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चदरम्यान सारा हिने “खरे ‘धुरंधर’ म्हणजे प्रेक्षकच” असे सांगत प्रेक्षकांच्या मताचे महत्त्व अधोरेखित केले. रिलीजपूर्वीच धुरंधर 2 ने मोठी चर्चा निर्माण केली असून, आता बॉक्स ऑफिसवर तो किती कमाल करतो आणि प्रेक्षकांच्या मनात कितपत स्थान मिळवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.