सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करणार? की घसरण होणार, तज्ञांचा मोठा दावा…

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळं निर्माण झालेली अस्थिरता, केंद्रीय बँकांकडून करण्यात येत असलेली सोने खरेदी, व्याज दरातील कपातीच्या आशेमुळं सोन्याचे दर वाढत आहेत. आता सोन्याचे दर एक लाख रुपयांचा टप्पा पार करणार का हे पाहावं लागेल.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार स्प्रोट असेट मॅनेजमेंटच्या वरिष्ठ पोर्टफोलिओ मॅनेजर रयान मॅकइंटायर यांच्या मतानुसार केंद्रीय बँकांच्या सोने खरेदीमुळं आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रमप यांच्या आक्रमक धोरणामुळं सोने दरात वाढ पाहायला मिळत आहे.
भारतातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर – 93,390 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचे दर – 85,610 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोन्याचे दर – 70,050 रुपये प्रति 10 ग्रॅम
जागतिक स्तरावर सोन्याचे दर 3200 डॉल प्रति औंसच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकन सोन्याच्या वायद्याचे भाव 3237.50 डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहेत. 2025 मध्ये सोन्यानं 20 वेळा उच्चांक गाठला आहे. महागाई, डॉलरची कमजोरी आणि केंद्रीय बँकांनी बदललेलं धोरण याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शाह यांना सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करेल असं वाटत आहे. त्यांनी द हिंदू बिझनेस लाईनश बोलताना म्हटलं की अमेरिकेच्या फेडकडून व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळं सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करु शकतात. अनिश्चिततेच्या काळात लोक सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करतात असं ते म्हणाले.