भोंदू अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होणार? कोट्यवधींच्या व्यवहारात कोण कोण रडारवर ..


पुणे : लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत. त्याच्या या काळ्या कारनाम्यात राजकीय नेत्यांची नावे उघडकीस येत असताना अनेक संशयास्पद कोट्यवधीचे व्यवहार रडारवर आले आहेत. हे व्यवहार नेमके कुणाचे आहेत. या व्यवहारात कोण कोण आहेत, याची माहिती समोर येण्यासाठी आता यात ईडीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, महिला अत्याचारानंतर खरातचे नाशिक तसेच शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत 100 तर जगदंबा पतसंस्थेत 32 खाती सापडली आहेत. या 132 खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे शिर्डी पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.

तसेच जगदंबा पतसंस्थेत इतर लोकांचे कागदपत्र वापरून खरात स्वत: 32 खाती ऑपरेट करत असल्याचे पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी कबुली दिली. तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्येही मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता आहे. कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पतसंस्था आणि बँकामध्ये खरातने कोणत्या तारखेला खाती उघडली. त्या तारखेला काय होते याचा तपास करण्यात येत आहे. तर आता कुणी कुणी त्याच्याशी व्यवहार केला आहे. त्यांचे धाबे दणाणले आहेत. आता भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीचा ससे मिरा आता खरातच्या पाठीमागे लागणार आहे. त्यामुळे अनेक धागेदोरे समोर येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!