पुण्याच राजकारण गुन्हेगार चालवणार? आंदेकर ते मारणे.. तब्बल 20 जणांची नावं समोर,मुख्यमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’


पुणे :महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शनवर आले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट दिल आहे.यामध्ये आंदेकर, मारणे, बापू नायर तसेच टिपू पठाण टोळी यांचा समावेश आहे.त्यामुळे आता गुन्हेगार पुण्याचं राजकारण चालवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे शहर पोलिसांनी शहरातील विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांची आणि उमेदवारांची कसून चौकशी केल्यानंतर एक विशेष यादी तयार केली आहे. ही यादी थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पाठवण्यात आली असून या यादीत तब्बल वीस गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा समावेश आहे.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक पाऊल उचललं आहे.

या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी एक विशेष ‘निरीक्षण समिती’ स्थापन केली आहे. ही समिती केवळ यादी तयार करण्यापुरती मर्यादित नसून, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे उमेदवार किंवा त्यांचे समर्थक कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करत नाहीत ना, यावर चोवीस तास लक्ष ठेवणार आहे.

तसेच हे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले उमेदवार मतदारांवर दबाव टाकणे, पैशांचा वापर करणे किंवा दहशतीचे वातावरण निर्माण करणे यांसारख्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी ही समिती तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान या यादीमध्ये प्रामुख्याने आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यासह सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच, कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे आणि गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर यांचीही नावे या यादीत आहेत. त्यांच्यावर 24 तास पोलिसांची करडी नजर असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!